रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम चित्रपटाने मोठी प्रसिद्धी कमावली होती. त्यांनतर त्याने याच आशयाचे अनेक चित्रपट बनवले. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून रोहित शेट्टी लेडी सिंगम सिनेमा करणार अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यावर आता रोहित शेट्टीनेच मौन सोडले आहे. रोहित शेट्टीच्या आगामी ‘सर्कस’ या चित्रपटाच्या प्रमोशनवेली त्याने ही घोषणा केली. आणि सोबतच दीपिका पदुकोण या चित्रपटात लेडी सिंघमची भूमिका साकारणार असल्याचं जाहीर केलं.